अंधेरीतील अतिवृष्टीग्रस्तांना खासदार रविंद्र वायकर यांचा दिलासा; नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची तातडीची मदत
मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिम येथील म्हातारपाडा-आंबोली परिसरातील धर्मा चाळ, पागे चाळ आणि आसपासच्या भागात मोठी झाडे घरांवर कोसळल्याने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत घरांची छप्परे, भिंती तसेच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
खासदार रविंद्र वायकर यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच खासदार रविंद्र वायकर यांनी तातडीने दुर्घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मदतकार्याचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना घरांवर पडलेली झाडे युद्धपातळीवर हटविण्याचे निर्देश दिले. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी परिसरातील मोठ्या झाडांची नियमित छाटणी करून त्यांची उंची नियंत्रित ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची तातडीची आर्थिक मदत
संकटग्रस्त नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी आपल्या माध्यमातून श्री. संजय झगडे, श्री. विशाल पाटील, श्री. दत्ताराम पांचाळ, श्री. शिवाजी गडकरी आणि श्री. अरुण असमाने यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली. याशिवाय, ज्या कुटुंबांच्या घरांवरील सिमेंट पत्रे आणि लोखंडी चॅनेलचे नुकसान झाले आहे, त्यांना आवश्यक बांधकाम साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
“नागरिकांना संकटात एकटे सोडणार नाही”
अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीची मदत मिळावी आणि त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही खासदार रविंद्र वायकर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याचे सांगण्यात आले.
🚩 संकटसमयी अंधेरीतील माझ्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा! 🚩
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिम मधील म्हातारपाडा, आंबोली परिसरातील धर्मा चाळ आणि पागे चाळ येथे अनेक घरांवर मोठी झाडे कोसळल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत नागरिकांच्या घरांची छप्परे,… pic.twitter.com/GwAKs7vuH9— Ravindra Waikar (@RavindraWaikar) July 7, 2026
स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त
खासदार रविंद्र वायकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस केली, आर्थिक मदत जाहीर केली आणि प्रशासनाला त्वरित कारवाईचे निर्देश दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे मदतकार्याला गती मिळाली असून, संकटाच्या काळात मिळालेल्या या सहकार्याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी विभागप्रमुख राजू पेडणेकर, अवंतिका राऊत, योगीराज गोसावी, सुनंदा नांदगावकर, ज्योती घागरे, आशिष आदावडे, राहुल जाधव, शैलेश मांजरेकर, फिरोज शेख, दिव्या नागर तसेच स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.



