राजकारण
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पांडुरंग बरोरा यांनी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. यावेळी शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते. तेव्हा पासूनच बरोरा शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरु होती. आता मात्र शिवबंधन बांधून बरोरा यांनी या चर्चेला पूर्णविराम लावला.

शिवबंधन बांधण्याच्या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आमदार रवींद्र फाटक आणि आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.
