राजकारणविधानसभा

राष्ट्रवादीने मागवले 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेसने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले असताना, आता राष्ट्रवादीनेही 288 जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. या उमेदवारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै असणार आहे. राज्यातील वय वर्षे 25 पूर्ण असलेली कुठलीही व्यक्ती या पदासाठी आपला अर्ज करू शकते. विशेष म्हणजे थेट ई-मेलद्वारे प्रदेश कार्यालयाकडे हा अर्ज पाठविण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदींसह इतर वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते.

यावेळी राज्यातील सर्व जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये शरद पवारसाहेबांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. व त्या त्या जिल्हयाचा आढावाही घेतला.

राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी, ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 1 जुलै पर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात किंवा जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button