Maharashtra Govमुंबई

आता आपण कोरोना व्हायरसच्या मागे लागायचे : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : राज्यात ज्यावेळी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हाची आरोग्यव्यवस्था आणि आताच्या व्यवस्थेत मोठा फरक आहे. आज कोरोनासोबतच्या सुरू असलेल्या लढाईत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक आरोग्य सुविधा उभारण्यात आणि औषधांच्या वापरात आपण जगाच्या पाठीमागे नाही तर पुढे आहोत. कोविड योद्ध्यांना लढण्यासाठी शस्त्र आणि आयुधं पुरवण्याचे काम आपण करत आहोत. मुंबईत ‘चेस द व्हायरस’ मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. आता कोरोना व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये, आपण व्हायरसच्या मागे लागायचे आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फेज-२ आणि ठाण्यातील कोविड रुग्णालयाचे ई -लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनमधली योग्य उपाययोजनांमुळे धारावी आणि मालेगावचा कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यात सरकारला यश मिळाले आहे. याच पद्धतीने इतर हॉटस्पॉटमध्ये काम करून कोरोना नियंत्रणात आणू, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव आणि मुंबई व ठाणे महापालिका आयुक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button