Maharashtra GovPoliticsमुंबईराजकारण

अजित पवार काढणार काँग्रेसच्या नाराज आमदारांची समजूत; भेटीसाठी बोलावले

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विकास निधी वाटपाच्या असमतोलाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार कैलास गोरंट्यालसह.

काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार या नाराज आमदाराची समजूत काढण्यासाठी सरसावले आहे. तत्पूर्वी पवारांनी गोरंट्याल यांना फोन करून त्यांना मोठे आश्वासन दिले आहे. त्यानंतर काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल हे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. अजित पवार यांनी आपल्या दालनात कैलास गोरंट्याल यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यांनी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते.

दरम्यान विकास निधी वाटपाच्या असमतोलाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेस आमदारांना शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या ‘त्या ‘आरोपांना अजितदादा उत्तर देतील असे म्हणत या वादापासून हात झटकले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button