खासगी दवाखान्यातील बिलांची होणार तपासणी : राजेश टोपे
मुंबई : कोविड-१९ विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची खासगी दवाखान्यातील बिले लेखा परीक्षकांकडून तपासून घेतल्यावरच रुग्णांना दिली जावीत. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयांसाठी स्वतंत्र लेखा परीक्षक नियुक्त करा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (यांनी दिले आहेत. भरमसाठ बिलाला आता लगाम घालण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत.
खासगी दवाखान्यातून कोरोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. मात्र आता खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षक तपासेल. शासनाच्या नियमानुसार ते बिल योग्य आहे का नाही याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जाईल. शासनाने निश्चित केलेले दर हे केवळ कोरोना उपचारासाठी नाही तर सर्वच रोगांवरील उपचारासाठी आहेत, असे टोपे यावेळी यांनी सांगितेल.

