शिक्षण
विदर्भातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार – माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे
विदर्भातील मूकबधीर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी विदर्भातील मूकबधीर, अंध, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करुन देत असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. तसेच शासनाच्या सर्व विभागांनी मागील दोन वर्षात दिव्यांगांसाठी असलेला राखीव 5 टक्के निधी खर्च केलेला असल्याचा आढावा तत्काळ सादर करण्याचे आदेश देखील डॉ.खाडे यांनी यावेळी दिले.
या बैठकीत आमदार बच्चू कडू, सुधाकर देखमुख, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.