Festival (फेस्टिव्हल)कोल्हापूर
कोल्हापुरातील गणेश उत्सवासाठी नियमावली जाहीर
कोल्हापूर : रंकाळा आणि पंचगंगेत विसर्जनासाठी मनाई घालण्यात आली आहे. आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीवर बंदी, अशी नियमावली महापालिकेने येत्या गणेशोत्सवासाठी जाहीर आहे. गणेशोत्सवातील देण्यासाठी सामाजिक उपक्रम केली.
कोरोनाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावरही असणारगर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, तसेच महापालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. विद्युत रोषणाई, देखाव्यांना फाटा देण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला विधायक वळण राबवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेशोत्सवाचा प्रारंभ येत्या शनिवार ता. २२ पासून होणार आहे; परंतु कोरोनाचा फैलाव वाढत असताना हा उत्सव आरोग्यदायी कसा ठरेल, याची दक्षता घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
गणेशोत्सव नियमावली अशी आहे:
- घरगुत गणेशमूर्तीची उंची दोन फूट असावी.
- त्या त्या प्रभागातच गणेशमूर्ती घ्यावी.
- विसर्जन देखील हिंदी मध्ये करावे रंकाळा, पंचगंगेत मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे.
- महापालिका गणेशमूर्ती स्वीकारेल.
- मूर्ती चतुर्थीपूर्वीच घरी आणाव्यात, त्यावेळी गर्दी टाळावी.
- मूर्ती दान करण्यासाठी वॉर्डनिहाय २०० ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- सार्वजनिक मंडळांसाठी परवानगीसाठी मंडळांनीही महापालिकेत येऊ नये.
- मंडळाची गतवर्षीची परवानगी ग्राह्य धरली जाणार.
- मंडपासाठी महापालिका शुल्क यंदा माफ मंडळांना दहा बाय दहा फूट इतक्याच मंडपाला परवानगी मिळणार.
- गणेश मूर्ती कमाल उंची चार फुटांपर्यंतच असेल.
- चतुर्थीपूर्वीच मूर्ती नेणे बंधनकारक.
- मूर्ती खरेदीसाठी मैदानावरच व्यवस्था आगमन, विसर्जन मिरवणुका नाहीत.
- देखावा, विद्युत रोषणाई नाही.
- आरती, पूजेसाठी चारच कार्यकर्त्यांना परवानगी, गल्लीत गर्दी टाळा खुले गणेश दर्शन टाळावे, त्यासाठी ऑनलाईन व्यवस्था करावी.
- मिरवणूक नसल्याने विसर्जन मार्गावरील सर्व स्वागत कक्ष नसणार पारंपरिक ठिकाणाऐवजी वॉर्डमध्येच विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येणार आहे.