NCPमुंबई

शरद पवार संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे : राजेश टोपे

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानालाही कोरोनाने विळखा घातला आहे. याबाबात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ‘शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे . पारनेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आले असता टोपे पत्रकारांशी बोलत होते.

दोन सुरक्षारक्षकांसह इतर चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. पवार साहेबांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते सुरक्षित व व्यवस्थित आहेत. त्यांची नीट काळजी घेतली जातेय,’ असे टोपे यांनी सांगितले . शिवाय त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचेही टोपे म्हणाले .

आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्यासाठी ते आवर्जून काही गोष्टी करत असतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते स्वतःही काळजी घेत असून चिंता करण्याचे कारण नाही,’ असेही राजेश टोपे म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button