सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ चित्रपटाचा शुभारंभ १० सप्टेंबरला !
कालच करीना कपूर खानने ‘भूत पोलीस’ या सैफ अली खानच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्टर शेयर केले. या चित्रपटाचा पोस्टर हा कालच प्रदर्शित झालेला असून यात अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम असे तारे झळकणार आहे. ही चौकडी या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाची कहाणी ही हॉरर कॉमेडी यावर आधारित आहे. हा चित्रपट १० सेप्टेंबरला २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
माहितीनुसार, रमेश तौराणी आणि अक्षय पुरी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात नोव्हेंबर मध्ये झाली होती आणि चित्रीकरण ५ फेब्रुवारीला संपले. माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रिकरण बऱ्याच निसर्गरम्य ठिकाणी केले गेले आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थानातील जैसलमेर आणि मुंबई या ठिकाणी झाले आहे.
या वर्षात चित्रपट सृष्टी पुन्हा नव्याने कामाला लागली आहे. रुही, लायगर, आणि आता भूत पोलीस असे अनेक चित्रपट पडद्यावर येत आहेत. कोरोनाच्या काळात चित्रपट सृष्टीमध्ये अवकळा पसरली होती. थेटर्स बंद झाल्याने बऱ्याच चित्रपटांच्या तारखा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच बरेच चित्रपट हे ओटीटी वर प्रदर्शित केले गेले होते. पण आता यावर्षी अशी परिस्थिती राहणार नाही असे दिसून येते

