मुंबई: सिद्धार्थ आनंद याच्या मार्गदर्शनाखाली दिग्दर्शित होणारा ‘पठाण’ ज्यामधे किंग खान आणि दीपिका
पादुकोण हे काम करणार आहेत असं बोललं जातंय. फास्ट अँड फूरियस आणि मिशन इम्पॉसिबल सारखे
बिग बजेट सिनेमे यांनी सुद्धा बुर्ज खलिफा मध्ये शूटिंग केले आहे.
पठाण हा भारतीय सिनेमा पाहिला असाअसेल ज्यात बुर्ज खलिफा मधले सीन्स दिसतील. असं पठाणाच्या डेवलपिंग विभागाने सांगितले आहे. हा एक ॲक्शन सीन असेल असेही वर्तवले जाते. पठाण सिनेमाची शूटिंग ही मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये
चालू झाली होती ती या जून मध्ये पूर्ण होईल अशी दिग्दर्शकांची आशा आहे.
या सिनेमात सलमान खान सुद्धा दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बुर्ज खलिफा वर हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझ
सारखं किंग खानला पाहायला तयार रहा असेही निर्माते सांगत आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे
अजून ठरवलेलं नाही आहे.


