आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढ मागणीबाबत शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश…
मुंबई दि.१७ : आशा स्वयंसेविकांच्या मानधनवाढ करण्यात यावी यासाठी एम.ए. पाटील यांच्या संघटनेने आंदोलन केले होते. या आंदोलकांनी ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्फत ६ फेब्रुवारी २०१९ ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.यावेळी श्री ठाकरे साहेबांनी यांच्या मागण्याला पाठिंबा दिला होता.व आशा स्वयंसेविकांच्या मागण्या विधिमंडळात मांडण्यासाठी ना.डॉ.गोऱ्हे यांना सुचना दिले होते. त्याप्रमाणे ना.डॉ.गोऱ्हे यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केले होते. अनेकवेळा अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न अशा विधिमंडळातील आयुधांमार्फत सरकारकडून सकारत्मक उत्तर प्राप्त करून घेतले होते.या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ना.डॉ.गोऱ्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला काल खरे यश आले.आरोग्यमंत्री ना.डॉ.एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णयनुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ केली.



केंद्र शासनाच्या मार्गदर्शन, सूचना,निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अांमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी नेमून दिलेल्या एकूण ७८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्या प्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. यात
◆ आशांना नेमून दिलेल्या भागातील सवर्ग लाभार्थ्यांची यादी करणे,दिलेल्या सेवांची माहिती व अहवालाचे अचूक संकलन वरिष्ठांना सादर करणे यासाठी १५०० रु मानधन देण्यात येईल तसेच,
◆ ग्राम आरोग्य पोषण दरदिवस अांमलबजावणी सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे बालके , माता कुटुंब कल्याण लाभार्थी इत्यादींना सेवा घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी रु २०० रु मिळेल.
◆ ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समितीची मासिक सभा समितीची सचिव या नात्याने बोलविणे, सभेचे इतिवृत्त तयार करणे, त्यास मान्यता घेणे आणि सभेतील निर्णयाच्या अंमलबजावणीची समितीस माहिती देण्याबाबत १५० रु मानधन देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद आहे.
◆ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील मासिक बैठकीत हजर राहून महिन्यातील केलेल्या कामाचा आढावा देण्यासाठी १५० रु असे एकूण महिन्यात २००० रु मानधन स्वयंसेविकांना देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद केले आहे.
या शासनाच्या निर्णयाबद्दल ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

