मनोरंजन

‘लावणी अमेरिकेत जाऊ शकते, तर मी विधानसभेत जाऊन लोककलावंतांचे प्रश्‍न का मांडू शकत नाही – सुरेखा पुणेकर

सुरेखा पुणेकर निवडणूक लढवणार?

‘लावणी अमेरिकेत जाऊ शकते, तर मी विधानसभेत जाऊन लोककलावंतांचे प्रश्‍न का मांडू शकत नाही, असा सवाल करून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. मोहोळ किंवा पुणे शहरातील मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून मी निवडणूक लढविण्यास तयार आहे,’ असे त्यांनी जाहीर केले.

लावणीचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लावणीचे योग्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी लावणी अकादमी सुरू करणार आहे. व्यासपीठावरून बोलण्यापासून ते लावणी सादर करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाईल. लोककला, पाश्‍चात्त्य नृत्याचा सहभाग वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. लोकांच्या आवडीप्रमाणे आपली कलाही बदलायला हवी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button