Health & FitnessMaharashtra Govआरोग्यमुंबई

कोरोना चाचणीसाठी मुंबईकरांना आताही द्यावे लागतात ४ हजार ५०० रुपये

मुंबई : गेल्या आठवड्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना चाचणी (रिअल-टाइम पॉलिमरेस चेन रिएक्शन, किंवा आरटी-पीसीआर, चाचणी) वरील ४ हजार ५०० रुपयांची अट काढली होती. तसेच मान्यताप्राप्त लॅबसोबत वाटाघाटी करण्यासाठी राज्यांना सूट दिली आहे. चाचणी दर निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळांची यादी तयार करण्याचे सांगितले होते.

तथापि, राज्य सरकारने अद्याप नवीन दर अधिकृतपणे जाहीर केले नाहीत. खाजगी लॅब नागरिकांना २ हजारांमध्ये चाचणी करण्याचे आश्वासन देत असले तरी, लोकांकडून ३ हजार ते ४ हजार वसूल करत आहेत. राज्य सरकार आणि महापालिकेने चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेतून निविदा मागवाव्यात अशी वैद्यकीय तज्ज्ञ आणि विरोधी पक्षांची इच्छा आहे. यामुळे प्रतिस्पर्धी वाढून चाचणीचे दर जवळपास २ हजारांपर्यंत खाली येतील असे सांगितले जात आहे.

कर्नाटकने यापूर्वीच प्रत्येक चाचणीसाठी हा दर २ हजार रुपये निश्चित केला आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार खासगी आणि सार्वजनिक रुग्णालये मुंबई महानगर प्रदेशात दररोज सुमारे ६ हजार चाचण्या केल्या जात आहे. मुंबईत आतापर्यंत दोन लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी राज्य मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते की आरटी-पीसीआर चाचणी घेण्यासाठी पूर्वी ठरविलेल्या कमाल मर्यादेची ४ हजार ५०० रुपयांचा दर लागू राहणार नाही, कारण चाचणी क्षमता आणि पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

देशांतर्गत उत्पादनात वाढ झाल्यामुळे आयात केलेल्या किटवर आता अवलंबुन राहणे बंद झाले आहे. एकट्या मुंबईत आयसीएमआरने डझनभर खासगी लॅबना मान्यता दिली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, बीएमसीने नमुने दिल्यास २ हजार रुपये आणि बीएमसीने शिफारस केलेल्या रूग्णांसाठी २ हजार ५०० रुपये घ्यावे थायरोकेअरसारख्या काही खासगी लॅबने चाचण्या करण्याची ऑफर दिली आहे.

तथापि, कोणतेही निश्चित दर नसल्यामुळे बहुतांश खासगी लॅबकडून बीएमसीकडून प्रत्येक चाचणीसाठी ३ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते, तर नियमित नागरिक चाचणी केंद्रात गेल्यास त्यांना ४ हजार ५०० रुपये शुल्क आकारले जाते. “बीएमसीने शहरभरात काही प्रभाग खासगी प्रयोगशाळांना नेमले आहेत. चाचणी करण्यासाठी बहुतेक खासगी लॅबमध्ये बीएमसी डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button