LokSabhaTravelठाणेठाणे महानगरपालिका

ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान केंद्र शासनाने द्यावे, खासदार राजन विचारे यांची मागणी

ठाणे शहरात मेट्रोसाठी २९ किमीच्या अंतर्गत मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची ९ हजार ६७४ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने ठाणेकरांना प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या मार्गाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार राजन विचारे यांनी शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी व या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शहरांतर्गत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी 20 टक्के अनुदान केंद्र शासनाकडून मिळावे असा सविस्तर डीपीआर प्रस्ताव महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात दिला असून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे राजन विचारे यांनी केली. यावेळी आयुक्त संजीव जयस्वाल, उपनगर अभियंता पापळकर उपस्थित होते.

ठाणे शहरांतर्गत मेट्रो रेल्वेची २२ स्थानके खालीलप्रमाणे असणार आहेत :

1. नवीन ठाणे

2. रायला देवी

3. वागळे चौक

4. लोकमान्यनगर बस डेपो

5.शिवाई नगर

6. नीलकंठ टर्मिनल

7. गांधी नगर

8. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह

9. मानपाडा

10. डोंगरीपाडा

11. विजय नागरी

12. वाघबीळ

13. वॉटर फ्रंट

14. पातली पाडा

15. आझादनगर बस स्टॉप

16. मनोरमा नगर

17. कोलशेत औद्योगिक क्षेत्र

18. बाळकुम नाका

19. बाळकुम पाडा

20. राबोडी

21. शिवाजी चौक

22. ठाणे जंक्शन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button