नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.
चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.
वर्षातील पहिल्या ग्रॅड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवत ऑस्ट्रेलियन जोकोविचने करिअरमधील १८व्या ग्रॅड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बरोबर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या विक्रमी २० ग्रॅड स्लॅम विजेतेपदाच्या जवळ तो पोहोचला आहे. वयाची ३० ओलांडल्यानंतर जोकोविचने मिळवलेले हे सहावे ग्रॅड स्लॅम विजेतेपद आहे. याबाबत त्याने नदालच्या विक्रमशी बरोबरी केली आहे.
🇦🇺 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🇫🇷 🏆
🇬🇧 🏆🏆🏆🏆🏆
🇺🇸 🏆🏆🏆@DjokerNole, take a bow 👏#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/5pJjfgJqop— #AusOpen (@AustralianOpen) February 21, 2021
