Politicsराजकारण

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप एसीबीकडून करण्यात आला आहे. यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही व हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून सांगण्यात आलं आहे की, अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. त्यामुळं आता काही माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या ९० टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक पद्धतीने न्याय मागत आहेत व सरकारला त्या धारेवर धरत आहेत. सरकारच्या विरोधात बोललं की, जुन्या केसेस वर काढल्या जात आहेत. डिसमिस झालेल्या केसेस सूडभावनेतून वर काढल्या जात आहेत, असं दरेकर म्हणाले. एखाद्याच्या न्याय हक्कांसाठी लढलं की अशी मुस्कटदाबी केली जात आहे. चित्रा वाघ लढणाऱ्या नेत्या आहेत, त्या आणखी ताकतीने लढतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button