मनोरंजन

समीर जोशी दिग्दर्शित ‘मिस यू मिस्टर’ चित्रपट २८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित !

समीर जोशी दिग्दर्शित आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील गीत वैभव जोशी यांनी लिहिली असून दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली असून थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली. चित्रपटाचे आत्तापर्यंत प्रकाशित करण्यात आलेले ट्रेलर, टीझर, पोस्टर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर ‘वरुण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवं विवाहित जोडपं आहे आणि वरुणला कामानिमित्ताने काही दिवसात लंडनला जावं लागत आणि सुरु होत ते ‘लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप’ यादरम्यान बऱ्याच समस्या येतात असं दिसतंय, मग ते यातुन कसा मार्ग काढतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. हा संपूर्ण सिनेमा ‘लॉन्ग डिस्टंटन्स रिलेशनशिप’ वर भाष्य करणारा आहे, जे नवरा बायको एकमेकांपासून कामानिमित्ताने लांब राहतात त्याच्यासाठी आणि जे नवविवाहित जोडपं आहे अशा सर्वाना हा सिनेमा खूप उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होते. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button