तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर
राज्यसभेत मंगळवारी तीन तलाक विधेयकावर मंगळवारी मतदान घेण्यात आले. या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने तीन तलाक आता अवैध ठरणार आहे. त्यासाठी तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभेत 26 जुलैला विधेयक मंजूर झाले होते. त्यामुळे राज्यसभेत मंजुरीसाठी मंगळवारी मतदान झाले. हे विधयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर करण्यात आले आहे. विधेयक लोकसभेसह राज्यसभेतही मंजूर झाल्याने केंद्र सरकारचा मोठा विजय मानण्यात येत आहे. राज्यसभेतही विधेयक मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Union Minister of Law & Justice Ravi Shankar Prasad: Today is a historic day. Both the Houses have given justice to the Muslim women. This is the beginning of a transforming India. #TripleTalaqBill pic.twitter.com/rXwPsfAtBF
— ANI (@ANI) 30 July 2019
फौजदारी गुन्हा; तीन वर्षे तुरुंगवास
मुस्लिम पतीने तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असा उच्चार करून पत्नीला तलाक देणे फौजदारी गुन्हा ठरणार आहे. तसेच पतीला तीन वर्षे तुरुंगवासाचीही तरतूद या विधेयका