BusinessFinanceअर्थव्यवस्थाउद्योग

हौसिंग फेडरेशन निवडणुकीकरिता ठराव पाठविण्याचे मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकरांचे आवाहन

मुंबई – मुंबई हौसिंग फेडरेशनची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणुकीकरिता ठराव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईतील हौसिंग सेक्टरच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असून जास्तीत जास्त हौसिंग प्रतिनिधिंनी ठराव पाठवणे आवश्यक आहे. 

पाच वर्षांमध्ये हौसिंग फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांकरिता विशेष योगदान देऊन कारभार सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे. फेडरेशनचा कारभार गतिमान करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने विक्रोळी, कन्नमवार नगर या ठिकाणी पूर्व उपनगरातील गृहनिर्माण संस्थांकरिता उपकेंद्र सुरु करण्यात आले असून त्याचे उदघाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. त्याचबरोबर गोरेगाव, आरे महामार्गालगत अशाच प्रकारचे उपकेंद्र पश्चिम उपनगरातील सहकारी संस्थांकरिता प्रस्तावित आहे. या दोन्ही उपकेंद्रांमुळे मुंबई शहरात जाण्याचा वेळ व प्रवास खर्चही वाचणार आहे. तसेच हौसिंग फेडरेशनच्या वतीने गृहनिर्माण संस्थांकरिता अनेक महत्वाचे शासन निर्णय करून महत्वपूर्ण भूमिकाही बजावली आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांकरिता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वयं पुनर्विकास योजना ही मुंबईभर यशस्वीपणे राबवली आहे. अशी अनेक महत्वपूर्ण कामे झाली आहेत व भविष्यात प्रस्तावित आहेत. याकरिता मुंबईतील गृहनिर्माण संस्थांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. म्हणून हौसिंग फेडरेशनच्या कामाला गती देण्यासाठी आपण आपला निवडणुकीकरिता प्रतिनिधीचा ठराव विहित वेळेत हौसिंग फेडरेशनच्या कार्यालयात सुपूर्त करावा, असे आवाहन भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button