विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी परप्रांतात जाणा-या मजूरांच्या व्यवस्थेची केली पाहणी
भाईंदर दि. २३ मे- मीरा-भाईंदर येथून उत्तर प्रदेश व बिहार येथे त्यांच्या गावी जाण्यासाठी निघालेल्या मजूर, कामगार वर्गाची आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली व त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
भाईंदर येथील जेसल पार्क चौपाटी मैदानात बाहेरगावी जाणा-या मजूर व कामगारवर्गाची एकत्रित येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज भाईंदर स्थानकातून सुटणा-या श्रमिक रेल्वे गाड्यांमधून हे मजूर व कामगार आपापल्या गावी जाणार आहेत.
त्याचबरोबर रेल्वेने उत्तरप्रदेश, बिहारला जाणाऱ्या प्रवाश्यांना भेटून त्यांच्या व्यवस्थेची चौकशी करत सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्यासोबत उपमहापौर हसमुख गेहलोत, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे व अमरजित मिश्र उपस्थित होते. #IndiaFightsCorona @RailMinIndia pic.twitter.com/kVa6igWhC2
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 23, 2020
प्रविण दरेकर यांनी जेसल पार्क येथील मैदानात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच याठिकणी अन्य काही सुविधांची कमतरता असल्यात ते उपलब्ध करण्याच्या सूचना दरेकर यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या. मजूर व कामगारांना त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा येथे आपल्या कामधंद्यावर येण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. याप्रसंगी मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, उप महापौर हसमुख गेहलोत,स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, पालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील,भाजपचे नगरसेवक ध्रुव किशोर पाटील, भाजपचे अमरजित मिश्रा आदी उपस्थित होते.

