Monsoonबृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

पुढील २४ तास मुंबईत वरुणराजाचे राज्य

रविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. हा पाऊस पुढील २४ तास मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ठाण मांडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला कोकणसह मुंबईत धुव्वाधार पाऊस झाला. त्यानंतर काहीशा विश्रांतीनंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. काही तासांच्या संततधार पावसाने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक सखल भागात पाणी साचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button