औरंगाबाद (संभाजी नगर) - Aurangabadक्राईम न्यूज
औरंगाबादमध्ये एटीएम मशीन घेऊन चोरटे लंपास
बीड बायपास जवळ असलेल्या एटीएम चोरीला गेल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. हे एटीएम स्टेट बँक ऑफ इंडिया चे असून या मशीनमध्ये २२ लाख ७७ हजार रुपये होते. दत्त मंदिराजवळ असलेल्या एटीएम केंद्रात ही घटना घडली. बीड बायपास हा वर्दळीचा आणि गजबजलेला रस्ता असून ह्या परिसरात व्यापारी संकुल आणि एक मंगल कार्यालय आहे.
शुक्रवारी दुपारीच ह्या मशीनमध्ये रक्कम भरण्यात आली असून ह्या एटीएम वर कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्याने पाळत ठेवून शनिवारी पहाटे संपूर्ण एटीएम मशीन उचलून नेले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.