सुभाष घईंच्या ‘विजेता’ चित्रपटाचे पोस्टर गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये लाँच !
हिन्दी चित्रपट दुनियेमध्ये शोमन म्हणून प्रख्यात असलेल्या सुभाष घई यांनी त्यांच्या मुक्ता आर्टस् लि.तर्फे सनई चौघडे, वळू आणि संहिता या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. संहिता या चित्रपटाला तर राष्टीय पुरस्कारही मिळाला. आता सुभाष घई त्यांच्या मुक्ता आर्टस् लि.तर्फे ‘विजेता’ या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचं प्रथम पोस्टर लाँचिंगचे अनावरण गोव्याचे सांस्कुतिक आणि कला मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट पोस्टरवरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे. हे लक्षांत येतं. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमोल शेटगे निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै, छायालेखक उदयसिंह मोहिते संगीत रोहन रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत. या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करताना दिसतील. ज्यामध्ये सुबोध भावे, पूजा सावंत, नेहा महाजन, पुजा बिश्त, माधव देवचाके, देवेन्द्र चौगुले, गौरीश शिपुरकर, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी, कृतिका तुलसकर, ललित सावंत आणि दिप्ती धोत्रे या कलावंतांचा समावेश आहे.
या चित्रपटाचं प्रोडक्शन डिझायनर सुनिल निगवेकर असून साकेत शिकांत यांची जाहिरात संकल्पना आहे. या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक महेश पावसकर हे आहेत. येत्या आँगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून पुढील वर्षीच्या २४ जानेवारीला तो प्रदर्शित करण्याचा सुभाष घईंचा विचार आहे.

