कोल्हापूर

बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पन्हाळ गडावर वाहिली आदरांजली

बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पन्हाळ गडावरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली. यावेळी शिवराष्ट्र ट्रेकर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे आणि इतर ट्रेकर्स त्यांच्या सोबत होते. तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम अखंडपणे करत असल्याबद्दल प्रशांत साळुंखे यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सोबत खासदार छत्रपती संभाजी महाराज, डॉ. सुजीत मंचेकर, माजी खासदार राजू शेट्टी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button