Sportsक्रिकेटक्रीडा

चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडूची कसोटीतून निवृत्ती

IPL 2021च्या लिलावासाठी केवळ एक दिवस शिल्लक आहे. या लिलावात अनेक बड्या खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. स्टीव्ह स्मिथ, जेसन रॉय, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गजांचे IPL भविष्य उद्या ठरणार आहे. तसेच, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याच्यावरही उद्या बोली लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या लिलावासाठी सारेच खेळाडू आणि चाहते उत्सुक आहेत. मात्र त्यातच CSKच्या एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

गेली अनेक वर्षे CSK संघाचा आणि दक्षिण आफ्रिकन संघाचा दमदार फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी त्याने आपला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला. पाकिस्तान दौऱ्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर डु प्लेसिसने हा निर्णय जाहीर केला.

फाफ डु प्लेसिस दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 69 कसोटी सामने खेळले आहेत. यावेळी त्याने 10 शतके आणि 21 अर्धशतकांच्या मदतीने 4163 धावा केल्या आहेत. फाफ डु प्लेसिसचा कसोटीमध्ये सर्वोत्तम स्कोअर 199 धावांचा राहिला आहे. तर 143 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5507 धावा केल्या आहेत.

एकदिवसीय सामन्यात त्याने 12 शतकं आणि 35 अर्धशतकं झळकावली आहेत. डु प्लेसिस यांनी 50 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1528 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button