आमदार रोहित पवार यांची कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जीत !
कर्जत : कर्जतमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल ४७ ग्राम पंचायातींवर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा लावला आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी असे सांगितले की आता माजी मंत्री राम शिंदे यांना या गोष्टीमुळे धक्काच बसला आहे. निवडणुकांचे निकाल लागताच राम शिंदे यांनी केलेला दावाही मोडीत निघाला आहे. तालुक्यातील ५६ ग्राम पंचायतीच्या निकालात भाजपचे माजी मंत्री राम शिंदे येणार की राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार रोहित पवार येणार यावर लोकांचे लक्ष लागून होते. यात वेगवेगळी मतांतरे होती. पण निकाल हा आमदार रोहित पवार यांच्या बाजूने लागला.
आमदार रोहित पवार यांनी कुकडी -सीनाचा पाणीप्रश्न, बस डेपो, भू-संपादन, रखडलेला पिक विमा यांसारख्या मोठ्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे असे नितीन धांडे सांगतात.

