Maharashtra GovPolitics

अखेर पेट्रोलची अखेर शंभरी पार ! इंधन दरवाढीचा पारा खाली उतरण्याची चिन्हे अशक्य !

मुंबई: आज बुधवारी देशभरात पुन्हा एकदा इंधनवाढ झाली आहे आणि या दरवाढीने चक्क शंभरी पार केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर राजस्थानातील श्री गंगानगर या शहारात साधे पेट्रोल १००.०७ रूपये झाले आहे. देशात पहिल्यांदाच साधे पेट्रोल १०० रुपयांवर गेलं आहे. आज सलग ९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आता प्रतिलिटर ९० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे.

आज दिल्लीत पेट्रोल २५ पैशांनी ८९ रूपये महाग झाले आहे, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा दर आहे. डिझेल देखील प्रति लिटर ८० रुपयांच्या अगदी जवळ आहे, उद्या किंमती वाढू शकतात आणि ते ८० रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. गतवर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीतील सर्वात महाग डिझेलची विक्री झाली होती, जेव्हा दर लिटर ३१ रुपये आणि पेट्रोलचा दर ४०.३३ रुपये प्रतिलिटर होता.

महाराष्ट्रातील परभणी, मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात पॉवर पेट्रोल १०० रुपयांवर गेले आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.९८ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.२५ रुपये आहे. एका वर्षात पेट्रोल आणि डीझेल चक्क १७ उपायांनी वाढला आहे.

पेट्रोल डिझेल महाग होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारला लागणारा कर. २०२० च्या सुरूवातीला पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क १९.९८ रुपये होते, आता ते वाढवून ३२.९८ रुपये केले गेले आहेत. त्याचप्रमाणे डिझेलवरील उत्पादन शुल्क १५.८३ रुपये प्रति लिटरवरून ३१.८३ रुपये प्रती लिटर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button