Sportsक्रीडा

टायगर वुड्स रोल-ओव्हर कार क्रॅशनंतर पोस्ट सर्जरी “जागृत, पुनर्प्राप्त”

अमेरिकेचा विख्यात गोल्फपटू टायगर वुड्स याच्या दोन्ही पायांना लॉस एंजेलिस येथे झालेल्या कार अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर वुड्सच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

रांचो पालोस वेर्डेसजवळ वुड्सच्या कारचे नियंत्रण सुटल्यानंतर दुभाजकाला आदळून ही कार गटांगळ्या खात शेकडो फूट खोल टेकडीखाली कोसळली. वुड्स स्वत:च कार चालवत होता.

अपघातानंतर त्याला लॉस एंजेलिस येथील हार्बर-यूसीएलए वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले. त्याचा उजवा पाय आणि घोटय़ावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘‘वुड्स शुद्धीत आला असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे,’’ असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिश महाजन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button