Health & Fitnessमुंबई

राज्यात कोविड-१९ लसीकरणाचा २रा टप्पा चालू

मुंबई: सोमवारी सुमारे ५३१ केंद्रांमध्ये ४०,३३१ आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोविड -१९ ची लस देण्यात आली
आहे. आतापर्यंत ३,०९,८४६ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही कोविड प्रतिबंधित लस देण्यात आली आहे. आरोग्य
विभागाचे असे म्हणणे आहे की मंगळवारपासून पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, कर वसुली
विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात होईल.

सुमारे मुंबईतील ९३.४% आरोग्य कर्मचऱ्यांना लस देऊन झाली आहे. यातील मुंबई उपनगरीय विभागातले दररोज ६१% कर्मचाऱ्यांना लस देण्याचे ध्येय असते.सुमारे ५,७४६ उपनगरीय विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिबंधत लस देण्यात आली आहे. मुंबई ही राज्यातून लसीकरणाच्या स्पर्धेमध्ये पहिली आहे तिच्या पाठोपाठ पुणे आणि नागपूर या शहरांचा क्रमांक
येतो.

पुण्यात आणि नागपूरमध्ये आतापर्यंत २७, ५५५ आणि १४,४३४ अनुक्रमे लस देण्यात आली आहे.
कोविड-१९ प्रतिबंधित लसीकरणाचा दुसरा टप्पा हा मंगळवार पासून चालू होणार आहे. CoWIN ॲपच्या
मदतीने आतापर्यंतच्या लसी देण्यात आल्या होत्या असे उदगार एका केंद्रीय अधिकाऱ्यांनी काढले आहे.
महाराष्ट्र राज्यात सोमवारपर्यंत १,९४८ रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button