Travel

एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते

एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनीअद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहनमंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले. राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक हे विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळातर्फे सवलत देण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button