Railwaysमुंबई

डबेवाल्यांना लोकल प्रवास करताना QR कोड घेणे बंधनकारक

मुंबई: मुंबईच्या डबेवाल्यांना रेल्वेकडे प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र, त्यासाठी लागणारे क्युआर कोड अद्याप मिळाले नसल्याची माहिती मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. पण QR कोड असणे बंधनकारक केले आहे. मात्र, या कोंडीच चौकशी करण्यासाठी पोलिस कार्यालयात गेले असता त्यांनी त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांचा नंबर दिला. आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणतीही जीआर निघाला नसल्याचे सांगितले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डबेवाल्यांना मोबाईलवर कोड पाठवला जाईल. आणि मग प्रवास करताना तो कोड वापरावे लागणार आहे. मात्र, यात एक अडचण अशी आहे की बहुतांश डबेवाल्यांकडे साधे फोन आहेत आणि त्यांचे शिक्षणही कमी आहे. त्यामूळे सुभाष तळेकर यांनी सरकारला अशी विनंती केली आहे की, डबेवाल्यांकडे त्यांचे ओळखपत्र आहे ते ग्राह्य धरत प्रवासाची अनुमती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button