अयोध्येत आज दिवाळी; राममंदिर भूमिपूजन 12.44 च्या मुहूर्तावर
ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला रवाना
अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा अवघ्या काही तासांत होणार आहे. अयोध्येत आज दिवाळी साजरी होणार आहे. ख-या अर्थाने आज रामाचा वनवास संपला असल्याची भावना देशवासीया्च्या मनात आहे.
ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झाले आहेत.
कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अयोध्या सील करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते भूमिपूजन होऊपर्यंत अयोध्येत एसपीजी आणि एनएसजी जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही कसून तपासणी होणार आहे. राम मंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस देखील सतर्क राहत आहे. भूमिपूजनाच्या या पार्श्वभूमीवर कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत.

