मुंबई

सी – लिंकवरून तरुणाची आत्महत्या

वांद्रे – वरळी सी – लिंकवर एका तरुणाने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२५) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण टॅक्सीने प्रवास करत वांद्रे-वरळी सी-लिंकवर आला. त्याने टॅक्सी थांबवण्यास सांगितली आणि समुद्रात उडी घेतली. दरम्यान, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाचा समुद्रात शोध घेत होते.

पार्थ एका सीए फर्ममध्ये नोकरी करत होता. तो मुलुंड येथील रहिवासी आहे. ‘ओहोटी असल्याने शोध घेणे फार अवघड नाही,’ असे समुद्री शोध व बचाव केंद्राचे प्रमुख कमांडर टी आशिष यांनी सांगितले. मात्र तटरक्षक दलाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. सायंकाळी ६.१५ वाजता सूर्यास्त होत असल्याने शोध थांबवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button