मनोरंजन

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर गीता माँची हजेरी!

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर येऊन पोचला आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी महाराष्ट्राला आपल्या नृत्याची चुणूक दाखवली आहे. आता या स्पर्धेत टॉप ५ स्पर्धक  उरले  आहेत. सेमीफिनले  च्या या कार्यक्रमात नृत्याच्या महागुरू गीता माँ  येणार आहेत. गीता माँ गेली अनेक वर्षं नृत्यसृष्टीत कार्यरत असून  त्यांच्याकडून कित्येक जणांनी  नृत्य शिकलं आहे.

या आठवड्यात एक अनोखा नृत्याविष्कार ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. एका कारमध्ये अपेक्षा आणि आशुतोष यांनी संपूर्ण नृत्य सादर केलं आहे. हे पूर्ण नृत्य एका टेकमध्ये केलं असून यात कोणतंही संपादन केलेलं नाही. रियालिटी शोच्या मंचावर झालेलं हे असं पाहिलंच सादरीकरण आहे.   

प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि अदिती जाधव या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक जण जिंकणार आहे ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’चा चषक. 

पाहा ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’, सोम.-मंगळ., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button