३४ ग्राम पंचायती मध्ये महिलांसाठी जागा राखीव
नाशिक: तालुक्यातील ३४ ग्राम पंचायतीमध्ये महिला राज चालणार आहे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी तहसील कार्यालयात जाहीर झाली. यात १८ ग्राम पंचायती अनुसूचित जमाती, २ अनुसूचित जाती, ९ सर्वसाधारण तर ५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे ओबीसी जातीतल्या महिलांसाठी राखीव झाले आहे.
अनेकांचा महिलांसाठी पदे राखीव गेल्याने हिरमोड झाला आहे. तहसील कार्यालयात सकाळी दहाला महिला सरपंच पदाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली, ५० टक्के आरक्षणनुसार लागलीच चिट्ठी प्रक्रिया ह्या पद्धतीने हे करण्यात आले. काही ग्राम पंचायतींचे महिला सरपंचपद हे सलग दुसर्यांदा राखीव झाले.
सह्हायक जिल्हाधिकारी तहसीलदार अनिल दौंडे याच्याकडे बर्याच जणांनी नाराजी व्यक्त केली. स्त्रियांना आता पुढे येण्यासाठी संधी मिळणार यामुळे बर्याच गावातून या गोष्टीचा आनंदोस्तव साजरा केला जात आहे