BJPMaharashtra Gov

वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला शॉक देण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. नागरिकही आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजप वीज बिलांची होळी करणार आहे. नागपुरातही माजी उर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक, दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांचं वीजबिल माफ करू, अशी घोषणा केली होती. परंतु हे सरकार आता पलटलं आहे. या सरकारनं दीड कोटी ग्राहकांवर अन्याय करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप चंद्रशेखर वाबनकुळेंनी केला. महावितरणने पाठवलेल्या वीजबिलाची नागपुरात होळी करण्यात आली.‘राज्य सरकारने ८ दिवसांत थकीत वीजबिलाची चौकशी करावी, शेतकऱ्यांकडे थकीत असलेलं वीजबिल काही भ्रष्टाचार नाही, पण वीजबिल माफी करावी,’ अशी मागणी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

कोट्यवधी जनता वाढीव वीजबिलामुळे भरडलेली आहे. या सरकारनं वीजबिल माफ केलं नाही, म्हणून आम्ही वीजबिलांची होळी केली. महाराष्ट्रात २ हजार ठिकाणी वीजबिलांची होळी होणार आहे. तरीही सरकार ऐकलं नाही आणि कोणी वीज कापायला आले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन त्यांना विरोध करतील, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे.

तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा नागरिकांना या आंदोलनात सहभाग होण्याचं आवाहन केलं आहे. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप राज्य सरकारला शॉक देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी भाजप वीज बिल होळी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आज भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले आहेत. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button