Maharashtra Gov

‘विवा ग्रुप’वर ‘ईडी’ ची धाड !

मुंबई: वसई-विरार मधील जयेंद्र ठाकूर यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची विवा ग्रुपची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अखेर अंमलबजावणी संचालयाने जप्त केली आहे. पीएमसी बँक घोटाळ्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पीएमसी बँकेतून कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केलेल्यांवर ईडी ही पूर्ण पणे लक्ष ठेऊन आहे असे बोलायला हरकत नाही. ईडी ने जेव्हा चाप घातला तेव्हा त्यांनी विवा समुहाची कार्यालये तसेच ठाकूर बंधूंची मालमत्ता यावर लक्ष ठेऊन, अंधेरीतील अनधिकृत मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीतील सूत्रधारानुसार , अंधेरी पूर्वेकडील केलेडोनिया इमारतीतील मालमत्ता ही मॅक स्टार कंपनीने बांधली आहे. मॅक स्टार ही हौसिंग डेवलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ची उपकंपनी आहे. ही कंपनी पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील सर्वात मोठी कर्जबुडाऊ कंपनी आहे. हे ईडीच्या निदर्शनास आले. त्यावरूनच ही कारवाई झाली.

एचडीआयएल चे राकेश व सारंग वाधवान यांनी मॅक स्टार च्या अंधेरीतील मालमत्ता बेकायदा त्या विवा ग्रुपकडे वळवल्या. त्यातील २ कार्यालयांची किंमत ही जवळजवळ ३४ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. वरतून कागद पत्रांमध्ये किंमत फक्त ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. विवा ग्रुप ने मॅक स्टार ला ३७ चेक दिल्याचे ईडी च्या तपासात आले. एचडीआयएल ने या आधीही येस बँकेचे देखील कर्ज बुडविले आहे. या सर्व रक्कमेचा गैरवापर या ग्रुप्सनी केल्याचे दिसून येते असे ईडी चे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button