Monsoon

२ ते ४ जुलै दरम्यान विदर्भातील बऱ्याच भागात वरुण राजाचे आगमन, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २ ते ४ जुलै दरम्यान विदर्भातील बऱ्याच भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला. पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पूर्व-अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात अधिक पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांच्या तुलनेत इतर भागांत पावसाचे प्रमाण कमी राहील. या दरम्यान पश्चिम-विदर्भाच्या जवळ असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. उर्वरित मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात मात्र प्रामुख्याने हलका पाऊस पडेल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे या सर्व भागांतील तापमान कमी होईल. २-४ जुलै मध्ये नदी-नाल्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांनी पुरा सारखी स्थिती उद्भवल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button