गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली.यात पहिली ते चवथी वर्गात शिकणारे ८ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जखमी झाले. यातील २ मुले गंभीर जखमी झाले. यात एक शिक्षिका देखील जखमी आहे. नयन कडबे व तेजू दूरबुडे, अशी गंभीर जखमी विद्यार्थ्यांची नावे असून शिक्षिका आणि इतर ६ विद्यार्थ्यांची नावे कळू शकली नाही.विजेच्या तडाख्याने शाळेच्या इमारतीला तडे गेले असून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या . या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. जखमी विद्यार्थी आणि शिक्षिकेवर रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close