LockDown मध्ये ‘ भारतीय डाक’ ची नागरिकांना मदत!
सिंधुदुर्ग: मार्च २०२० पासून जो लॉक डाऊन झाला त्यामध्ये बरेच व्यवसाय बंद पडले, लोकांच्या नोकर्या गेल्या, दुकाने बंद झाली आणि पैसा संपला. प्रत्येकजण हलाखीचे जीवन जगू लागला. आर्थिक हाल झाले, रोजगार गेले , आर्थिक स्त्रोत कसा निर्माण करावा असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र कोरोनाच्या काळात पोस्टाने मोठा आर्थिक हातभार दिला. २५ मार्च ते डिसेंबर २०२० या काळात तब्बल २६ हजार ९१३ नागरिकांना ७ कोटी ७३ लाख ५९ हजार १०५ रुपये एवढी रक्कम घरपोच करीत कोरोनाच्या काळात आर्थिक साथ देण्याचे काम भारतीय डाक विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले.
पोस्टातील एप्स प्रणालीद्वारे बँकेतील रक्कम सहज मिळवणे लोकांना शक्य झाले. यासाठी बँकेत जाण्याची गरज नव्हती घरपोच बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही पुढे सरसावली होती. याद्वारे घरबसल्या कुठल्याही बँक खात्यातून पोस्टमन मार्फत पैसे काढण्याची सुविधा पोस्टाने करून दिली. आधार कार्ड नंबर आणि अंगठ्याच्या ठश्याद्वारे हे व्यवहार करण्यास पोस्टाने परवानगी दिली आहे.
तब्बल ४१६ पोस्टमननी सामाजिक अंतर पाळून कोरोनाच्या काळातही सेवा दिली. के.एन.बावनकुळे जे सिंधुदुर्गातील डाकघर अधीक्षक आहेत त्यांनी आपले मत देताना असे सांगितले कि, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून जनतेला चांगल्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत मोबईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल बँकिंग नि:शुल्क आहे. दर मंगळवारी एप्स जास्त व्यवहार करण्याची विशेष मोहीम सुरु आहे.