Maharashtra GovRatnagiri

रत्नागिरीत पेटणार प्रशासन विरुद्ध सलून व पार्लर वाद?

रत्नागिरी: सलून वा पार्लर सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले नसल्याने तरीही स्थानिक पातळीवर सलून वा पार्लर सुरू केल्यास रत्नागिरी जिल्हा प्रशासन त्यात लक्ष घालून कारवाई करेल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

राज्य शासनाकडून आलेल्या सूचना व निर्देशांची अमलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. त्यामुळे दुकाने बंद ठेवायची की सुरू हे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येत नसून राज्य शासनाकडून असे आदेश देतील त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन त्याची अमंलबजावणी करणार आहे. सलून किंवा पार्लर सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कसलेही सूचना वा निर्देश आलेले नसल्यामुळे सलून किंवा पार्लर सुरू झाले तर तो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी प्रशासनाची भूमिका आहे तर संघटना दुकाने सुरु करण्याच्या विचारावर ठाम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button