महापालिका निवडणुकांसाठी यावेळी भाजपची कोणाशीही युती नाही : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पालिका निवडणुकांबाबत बोलताना असे वक्तव्य केले की, यावेळी ते स्वबळावर निवडणूक लढनार आहेत. वरतून या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत युती होणार नाही असेही स्पष्ट शब्दात सांगितले. महापालिका मिळकतदारां लागू केलेली अभय योजना, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वांवरील प्रकल्प सहा मीटर रुंदीचे रस्त्यांचे रुंदीकरण या महत्वपूर्ण निर्णयाचे समर्थन फडणवीस यांनी केले आहे.
महापालिकेची कामे उत्तम प्रकारे होत असून आपण मुख्यमंत्री असताना आपण पुण्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती असेही उद्गार काढले आहेत. सगळ्याच महापालिकांनी वेग घेतला पाहिजे. मात्र महापालिकांनी स्थानिक स्तरावरील समस्याही अधिक असतात असा टोला ही त्यांनी लावला होता.
समान पाणीपुरवठा, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, मल:निसारण प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, चांदणी चौक, पंतप्रधान आवास योजना, मेट्रो, पीएमपीएमएल, एचसीएमटीआर, एसआरए, वैद्यकीय महाविद्यालय, पीपीपी योजना, यांसह ‘स्मार्ट सिटी’च्या कारभाराबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीसाठी महापौर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी, आमदार उपस्थित होते.


