Monsoon

२४ तासानंतर सायन – पनवेल मार्गावरील पाण्याचा विसर्ग

सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी खारघर आणि कोपरा गावासह महामार्गवर पाणी साचले होते. त्यामुळेच सायन – पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग होताच सिडको आणि एमएसआरडीसीने नाला मोकळा करण्यास सुरूवात केली. या वेळेस सर्व पाण्याचा निचरा झाला असला तरी कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा झाला आहे.

खारघर येथील पांडव कड्याचा ओढा तुटल्याने ओढ्यातील सर्व पाणी आणि सतत सुरु असलेल्या पावसाचे पाणी सायन – पनवेल मार्गावर येऊन कोपरा गावात शिरले व तिथे पूरस्थिती निर्माण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button