Monsoonमुंबई

मुंबईत पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसापासून मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली असून मुंबई मात्र कोरडीच होती. अशा पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे परिसरात हजेरी लावून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असून आज दिवसभर जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने व्यक्त केला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. या बरोबरच नवी मुंबईत वाशी, बेलापूर आणि पनवेलमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button