बृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

मालाड पूर्व भागातील पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळून १८ जण मृत्युमुखी, तर १३ जखमी

मुंबई : मालाड पूर्व भागातील पिंपंरीपाडा येथे सोमवारी रात्री २ च्या सुमारास झोपडडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळून सुमारे १८ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरए आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर शताब्दी रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन दुर्घटनेतीलजखमींची विचारपूस केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे विरोधकांनी आज विधानभवनात गोंधळ करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या घटनेत ६ जण ठार झाले आहेत. तर कल्याणमध्ये देखील भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button