CongressElectionराजकारण

“१२ ‘तरुण तुर्क’ नव्या महाराष्ट्राची मशाल बनणार

“१२ ‘तरुण तुर्क’ नव्या महाराष्ट्राची मशाल बनणार”

-महाराष्ट्राच्या आजच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या “मैं भी नायक” स्पर्धेच्या अंतिम १२ विजेत्यांची नावे जाहिर. बनणार ‘एक दिवसाचे मुख्यमंत्री’

8AAB560D-3C5B-40FF-BA10-69F7B96E06C7

मुंबई , दि . २१ :
राज्यातील युवकांना कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात, राज्यातील जनतेला कोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते, अशा विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी “मैं भी नायक” स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘WakeUp Maharashtra: उद्यासाठी आत्ता’ या कॅम्पेन अंतर्गत केले गेले होते. त्यासाठी एक प्रति विधानसभा स्थापना करून प्रत्येक स्पर्धकाला विविध मतदारसंघांतील सत्ताधारी, विरोधीपक्ष किंवा अपक्ष असे विविध पक्षांचे आमदारपद देण्यात आले होते. या प्रति विधानसभेत स्पर्धकांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

‘WakeUp Maharashtra’ आणि “मैं भी नायक” स्पर्धेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवकांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळून ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी मत देऊन टॉप २० पैकी १२ अंतिम विजेत्यांची निवड केली. या अंतिम १२ विजेत्यांची नावे आज जाहीर केली गेली ती पुढीलप्रमाणे- शहजाद मणियार, पृथ्वीराज एकळे , प्रगती सांगळे, प्रशांत राठोड, अनुश्री हिरादेवे, विजय अंजन, आशिष कांबळे, अजिंक्य बोराडे, मंजुश्री घोणे, स्वप्निल खरात, वैभव देरकर, शुभम हेनगडे हि १२ जण ‘मैं भी नायक’ स्पर्धेचे ‘एका दिवसाचे मुख्यमंत्री ‘ बनले आहेत. या बारा जणांना विविध राज्यांच्या मा. मुख्यमंत्र्यासोबत एक दिवस राहून त्यांचे कामकाज बघण्याचा आणि विकासावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. ‘मैं भी नायक’ स्पर्धेच्या आणि ‘WakeUp Maharashtra: उद्यासाठी आत्ता’ या कॅम्पेनच्या ‘टिक टॉक’ स्पर्धा, शाहीर स्पर्धा, स्टिक युअर व्हॉइस ई. विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न मांडले गेले. संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांच्या सहभागातून ‘वेक अप महाराष्ट्र’ देशातील पहिला ‘युवकांचा जाहीरनामा’ बनवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button