आरोग्य

राज्यातील पहिल्या ‘मोबाईल फूड टेस्टींग लॅब’ चे उदघाटन

राज्यात आता विविध अन्नपदार्थांची मोबाइल फूड टेस्टिंग लॅबमार्फत तपासणी होणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘राज्यात लवकरच अजून एक मोबाइल फूड टेस्टिंग लॅब दाखल होणार आहे. मुंबईसाठी स्वतंत्र मोबाइल फूड टेस्टिंग लॅब असेल’, अशी माहिती मंत्री रावल यांनी यावेळी दिली.

या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्न सुरक्षा अधिकारी, एक विश्लेषक आणि परिचर यांची टीम कार्यरत असणार आहे. ही व्हॅन गर्दीच्या व खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्न सुरक्षा व अन्न भेसळीबाबत जागरूकता करून तसेच अन्नाची प्राथमिक तपासणी करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button