१. जास्त काम करणे वा अतिकाम
होय, जास्त काम करणे ही जरी यशाची पायरी असेल तरीसुद्धा जास्त काम केल्यामुळे झोपेचे विकार, (Substance
Abuse) म्हणजेच वाईट सवयी ज्या शरीरासोबत मनाला ही हानिकारक असतात जसेकी ड्रग्स, मद्यपान आणि इतर
अनेक सवयी तुम्हाला त्रास देऊ शकतात. लेखिका डायान फेसाल या अतिकामच्या बाबतीत असा बोलतात की,
“Addiction to work is a kind of psychological problem that is characterized by two primary
features- working excessively and working compulsively”
२. प्रत्येक काम नीट करण्याचा हट्ट
आमिर खान ला मिस्टर परफेक्शनिस्ट असा बोलतात पण हेच परफेक्सनिस्म घातक ठरते. कारण काम नीट केली नाही
तर आपल्याला कोणी काही बोलले तर चारचौघांत आपली प्रतिमा वाईट होईल या भीतीने माणसात चूक न करण्याची
सवय तयार होते व मानसिक रित्या चूक झाल्यावर त्रास होतो.
३. नाही बोलायला शिका
आपल्याबद्दल कोणाच्या मनात किंतू येऊ नये यामुळे आपण सहसा कोणाला नाही बोलत नाही. यामुळे सर्वांच्या इच्छा
सांभाळत बसतो व यात आपली कामे आणि इच्छा बाजूला राहतात. आपल्याला सर्वांचे मन राखता येणार नाही अशी
मनाची समजूत घालून नाही बोलायला शिका जेणेकरून प्रत्येकालाच आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करता येतील.
