क्राईम न्यूजनाशिक

शिर्डीमध्ये कोयत्याने वार करून एकाच कुटुंबातील तिघांची हत्त्या

शिर्डी येथे कातोरे मळा येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करून तिघांची हत्या करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दाम्पत्य व त्यांच्या मुलीचा समावेश आहे. नामदेव ठाकूर (वय ५०), खुशी ठाकूर (१५ वर्ष), दगाबाई नामदेव ठाकूर (४५ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. शिर्डी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अर्जुन किसन पन्हाळे हे आरोपीचे नाव आहे.

पन्हाळे व ठाकूर यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्या वादातूनच ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याशिवाय हत्या झालेल्या कुटुंबातील इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button